गुलाबराव महाराज
संत गुलाबराव महाराजाना ‘प्रज्ञाचक्षु’ मधुरदैवताचार्य असे म्हणतात. त्यांना ‘प्रज्ञाचक्षु’ म्हणतात कारण ते नऊ महीन्याचे असतांनाच त्यांचे दोन्ही डोळयांची दृष्टी गेली. असे असतांना सुध्दा ते वेदांचे गुरू, तत्वज्ञान,शारिरीक शास्त्र, अनेक प्रसंग त्यांना आत्मसात होते. संस्कृत मध्ये ‘ प्रज्ञा ‘ म्हणजे ‘बुध्दीवान’ आणी डोळे म्हणजे ‘चक्षु’ त्यांच्या मध्ये खुप अदैवत शक्ती होती ती म्हणजे बुध्दीवान दृष्टी. त्यांची बुध्दी जगातील कोणतेही पुस्तक हातात घेतल्यानंतर ते पुर्ण वाचुन घेत होते. त्यांची बुध्दी शरिराचा महत्वाचा भाग म्हणजे डोळे नसतांना सुध्दा ग्रहण करित होती.त्यांचे पुर्ण नाव गुलाब गुंणडोजी मोहोड. त्यांचा जन्म ६ जुलै १८८१ मध्ये छोटयाशा गावी माधान जि. अमरावती. महाराष्ट्र या ठीकाणी झाला.
त्यांचा मृत्यु वयाच्या ३४ व्या वर्षी १९१५ मध्ये झाला. दृष्टी नसंताना सुध्दा त्यांनी १३३ पुस्तके वेगवेगळया विषयांवर तेही ६००० पानाची तयार केली. १३० चर्चात्मक पुस्00d;तके आणी २५,००० काव्;यांची कडवे लिहीली. त्यांच्या आईचे १८८५ मध्ये निधन झाले. त्यानंतर ते ६ वर्षाचे असतांना
त्यांच्या आजोळी लोणी टाकळी या गावाला राहायला गेले. लोक त्यांच्याकडे येत असत तेव्हा त्यांना त्यांच्या अलौकीक बुध्दी सामर्थ्य लोकांना कळले आणी ते दृष्टीहीन आहेत हे समजले. रात्रीच्या वेळी ते श्वासावर लक्ष केंद्रित करुन समाधी करित असत. त्यांना धार्मीक गीत म्हणजे भजन, धार्मीक श्लोक आवडत असत. ‘ मधुरदैवत ‘ म्हणजे त्यांनी सुरु केलेली नविन विचाराची शाळा होय. अदैवत म्हणजे (दृश्य आणी अदृश्य) वेदांचे तत्वज्ञान जे देवापासुन वेगळे आहेत(आत्मा आणी ब्रम्हा) त्यांना ‘अदैवत’ म्हणतात.’मधुरभक्ती’ म्हणजे भगवान कृष्णाची उपासना होय.त्यांना वयाच्या १० व्या वर्षापर्यंत वेद आणी शास्त्राचा अभ्यास अवगत होता. त्यांचा विवाह गणाजी भुयार यांची मुलगी मणकर्णीका हीच्याशी १८९६ मध्ये झाला. त्यांनी १८९७ मध्ये धार्मीक तत्वज्ञान ,निबंध, कविता लिहीण्यास सुरुवात केली. तेव्हा ते १६ वर्षाचे होते. त्यांनंतर ते वेगवेगळया गावाना, शहरांना जाऊन तेथिल लोकांना भेटुन त्यांच्याशी धार्मीक चर्चा करुन लोकांना तत्वज्ञान पटवुन दिले. १२ व्या शतकातील संत ज्ञानेश्वर महाराज १९०१ मध्ये संत गुलाबराव महाराजाना भेटले. त्यांना गुलाब महाराजांनी स्विकारलेले तत्वज्ञान आवडले.
“गुलाबराव महाराज स्वत:ला संत ज्ञानेश्वरांची मुलगी आणी भगवान कृष्णाची पत्नी मानायचे. १९०५ मध्ये त्यांनी भगवान कृष्णाशी विवाह केला. ते एका विवाहीत स्त्री सारखा पेहराव करायचे. कंपाळावर लाल कुंकू, गळयात मंगळसुत्र या प्रकारे हिंदु विवाह पध्दतीने ते राहत असत.१९०२ मध्ये ते २१ वर्षाचे होते तेव्हा त्यांनी डार्वीन आणी स्पेनसरच्या तत्वज्ञानावर चर्चात्मक निंबध लिहीले. त्यांनी वेगवेगळया विषयावर पुस्तके लिहीली जसे ध्यान, योगा आणी भक्ती. त्यांनी ‘ मानस आयुर्वेदा’ नावाचे पुस्तक लिहीले ज्यात नसशास्त्रीयदृष्टया आयुर्वेदाची माहीती लिहीली आहे. आपण कल्पना करु शकणार नाही की एक आंधळी व्यक्ती पुस्तके लिहु शकतो. तेही वेगवेगळया विषयावर जसे ध्यान, योगा, उपनिषध, ब्रम्हसुत्र ,शास्त्र आणी कठीण असे विषय त्यांना समजले. ज्यांचे खुप शिक्षण झाले आणी जे अत्यंत हुशार आहेत. त्यांनी सुध्दा असे विषयावर लिखाण केले नसेल. त्यांना शास्त्राचा अभ्यास करण्यास वेळ कधि मिळायचा..कठिण अशा संस्कृत भाषेचे ज्ञान त्यांनी कसे मिळविले. त्यांची लिहीण्याची वेदीक पध्दत त्यांनी कशी अवगत केली. हे सर्व प्रश्न आपल्या मनाला आणी बुध्दीला पडतात जेव्हा त्यांचे जीवन चरित्र आपण वाचतो.
जुन्या भारतिय पध्दतीमध्ये शुद्र वर्ग कुणबी समाजाला वेदांचा अभ्यास करण्याची मनाई होती. ब्राम्हण पंडीतांना बोलवुन पुजा केली जात असे. त्यांनी लोकांना सांगितले की त्यांना वेदांचा अभ्यास करण्याचा अधिकार नाही.पंरतु त्यांना कुणीही वेद शिकविले नाही तरि सुध्दा त्यांनी ‘आत्मज्ञानाच्या’ बळावर((स्वत:च्या माहीतीवर) त्यांनी वेदांचा अभ्यास करुन वेद आणी ब्राम्हण पंडीतांचा सन्मान केला. विद्वान पंडीतांसोबत त्यांनी विज्ञान शास्त्रावर वादविवाद केले.२० सप्टेंबर १९१५ मध्ये समर्थ सतगुरु प्रज्ञाचक्षु मधुरदैवताचार्य संतश्री गुलाबराव महाराज यांनी समाधी घेतली, त्यांनतर ते अधिकाधीक प्रसिध्द झाले. त्यांचे पुष्कळसे तत्वज्ञान बाबा महाराज (१९६४ मध्ये निधन झाले). त्यांनी संत गुलाब महाराजावर खुप पुस्तके लिहीलीत. त्यांचे चर्चात्मक साहीत्य ‘भावार्थ दिपीका’ संत ज्ञानेश्वरांनी लिहीलेल्या, प्रकाशन गीता प्रेस, गोरखपुर, येथे लिहीले आहेत.