Close

शेतकरी आत्महत्या शाखा

कर्तव्यसूची

 

कामकाज पाहणारे कर्मचारी:- सागर बाबुराव बनसोडे, महसूल सहायक

तपशिल

1 तहसिलदार, (सर्व) यांनी सादर केलेल्या शेतकरी आत्महत्या प्रथमदर्शनी प्राथमिक अहवालावरून आत्महत्याची नोंदी घेणे

2 शेतकरी आत्महत्या प्रथमदर्शनी प्राथमिक अहवालावरुन आत्महत्याबाबतची माहिती शासनास व मा. विभागीय आयुक्त, अमरावती यांना सादर करणे

3 शेतकरी आत्महत्या निकषानुसार पात्र प्रकरणातील वारसांना मदत देण्याकरीता शासनाकडून निधी मागणे

4 शेतकरी आत्महत्या निकषानु‌सार पात्र प्रकरणातील वारसांना मदत देण्याकरीता शासनाकडून प्राप्त निधी तहसिलदार (सर्व) यांचे मागणीनुसार वितरीत करणे

5 शेतकरी आत्महत्या प्रकरणी शसनाकडून प्राप्त निधीचा (शासनाकडून प्राप्त निधी झालेला खर्च व 5 शिल्लक निधी) हिशोब ठेवणे तसेच महालेखापाल यांचे कार्यालयाशी ताळमेळ घेऊन शासनास उपयोगिता प्रमाणपत्र सादर करणे

6 तहसिलदार, (सर्व) यांना आत्महत्या प्रकरणी सखोल चौकशी करुन प्रस्ताव सादर करणेबाबत कळविणे.

7 संबंधित तहसिलदार, यांनी सादर केलेल्या शेतकरी आत्महत्या प्रकरणातील प्रस्तावांच्या नोंदी घेऊन, जिल्हास्तरीय समितीची बैठक आयोजित करणे

8 जिल्हास्तरीय समितीची बैठकीमध्ये शेतकरी आत्महत्या प्रकरणावर झालेल्या निर्णयाचे इतिवृत्त तयार 8 करून, मा. विभागीय आयुक्त, अमरावती, संबंधित तहसिलदार, जिल्हास्तरीय समितीचे बैठकीस उपस्थित अधिकारी/कर्मचारी व शे.आ. संबंधित इतर कार्यालयास सादर करणे.

9 तालुकानिहाय पात्र/अपात्र प्रकरणांची यादी तयार करणे

10 शेतकरी आत्महत्या मासिक व वार्षिक विवरणपत्र तयार करणे.

11 आत्महत्याग्रस्त शेतक-यांचे वारसांचे आलेले अर्ज व तक्रार यांचे निवारण करणे.

12 शासनाने व वरिष्ठ कार्यालयाने शेतकरी आत्महत्या संदर्भात मागितलेली माहिती विहीत मुदतीमध्ये सादर करणे

13 शेतकरी आत्महत्या संदर्भात आलेले माहिती अधिकार विहीत मुदतीमध्ये निकाली काढणे

14 शेतकरी आत्महत्या संदर्भातील स्थायी आदेश जतन करणे

15 गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना संबंधित अर्ज/तक्रार यांचे निवारण करणे

16 अधिकारी यांनी वेळोवेळी सांगीतलेले काम विहीत मुदतीमध्ये करणे.

निकषानुसार पात्र प्रकरणातील आत्महत्याग्रस्त शेतक-यांच्या वारसांना शासन निर्णय महसूल व वन विभाग क्र. एससीवाय-१२०५/प्र.क्र. १८९/म-७, दिनांक २३ जानेवारी, २००६ अन्वये दिलेल्या निर्देशानुसार मदत दिली जाते