अमरावती जिल्हास्तरीय गुंतवणूक शिखर परिषद
औद्योगिक विकासासाठी ₹2087.31 कोटींचे करार
अमरावती जिल्हास्तरीय गुंतवणूक शिखर परिषद
औद्योगिक विकासासाठी ₹2087.31 कोटींचे करार
मा. विकास आयुक्त (उद्योग) श्री. दीपेंद्रसिंह कुशवाह यांच्या मार्गदर्शनाखाली आणि मा. श्रीमती श्वेता सिंगल यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय गुंतवणूक शिखर परिषद दिनांक ११ मार्च रोजी हॉटेल ग्रँड महफिल, कॅम्प, अमरावती येथे यशस्वीपणे पार पडली. या कार्यक्रमात मा. जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्घाटन करण्यात आले. या उपक्रमाचा मुख्य उद्देश गुंतवणूकस्नेही वातावरण निर्माण करणे आणि अमरावतीच्या औद्योगिक वाढीस चालना देणे हा होता.
या परिषदेत, ७८ प्रस्तावित उद्योगांनी महाराष्ट्र शासनासोबत सामंजस्य करार (MoUs) केले, ज्यामध्ये ₹2087.31 कोटींची गुंतवणूक निश्चित करण्यात आली. या गुंतवणुकीतून अमरावती जिल्ह्यात ५३०९ हून अधिक रोजगार संधी निर्माण होण्याची अपेक्षा आहे.
मा. जिल्हाधिकारी श्री. सौरभ कटियार यांनी अमरावतीला एक प्रमुख गुंतवणूक केंद्र म्हणून पाहण्याचे आवाहन केले. त्यांनी येथील PM MITRA टेक्सटाईल पार्क आणि सुधारित विमान सेवा यावर प्रकाश टाकत अमरावती हा भारताच्या मोठ्या टेक्सटाईल हबपैकी एक म्हणून उदयास येत आहे, असे सांगितले.
मा. विभागीय आयुक्त श्रीमती श्वेता सिंगल यांनी गुंतवणूकदारांना हे करार प्रत्यक्षात गुंतवणुकीत, उत्पादनात आणि रोजगार निर्मितीत रूपांतरित करण्याचे आवाहन केले, ते केवळ कागदावरच मर्यादित राहू नयेत याकडे विशेष लक्ष देण्यास सांगितले.
या परिषदेला विविध मान्यवर अधिकारी आणि उद्योग क्षेत्रातील नेते उपस्थित होते, त्यामध्ये:
उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञांनी नवीन गुंतवणूक संधी, ODOP (वन डिस्ट्रिक्ट वन प्रोडक्ट), आणि निर्यात क्षेत्रातील संधी यावर उपस्थितांना मार्गदर्शन केले. जिल्ह्यातील उद्योजक आणि गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणावर सहभाग नोंदवला, यामुळे अमरावतीतील उद्योग क्षेत्राची वाढती क्षमता अधोरेखित झाली.
हा कार्यक्रम श्री. निलेश निकम, सहसंचालक, विभागीय कार्यालय, अमरावती यांच्या समन्वयाने आयोजित करण्यात आला, तर श्री. रविंद्र दाभाडे, व्यवस्थापक, जिल्हा उद्योग केंद्र, अमरावती यांनी आभार प्रदर्शन केले.
ही गुंतवणूक शिखर परिषद अमरावतीच्या औद्योगिक विस्तार आणि आर्थिक विकासाच्या दिशेने एक महत्वपूर्ण पाऊल आहे, आणि जिल्ह्याला एक समृद्ध व्यावसायिक केंद्र म्हणून बळकट करण्यासाठी मदत करणार आहे.