जिल्हा आपत्ती व्यवस्थापन शाखा (नियंत्रण कक्ष)
कर्तव्यसूची
१. जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणतंर्गत जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये २४ तास (नियंत्रण कक्ष) कार्यान्वित आहे.
२. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत जिल्हा कृती आराखडा तयार करणे.
३. अमरावती जिल्ह्यात ३०० आपदा मित्र तयार करण्यात आले आहे.
४. जिल्ह्याची पूर, यात्रा, दशहतवादी हल्ले याविषयांची (SOP) तयार करण्यात आली आहे.
५. जिल्ह्यात नैसर्गिक व मानवनिर्मित आपत्तीमध्ये जिल्हा शोध बचाव पथक गठीत करण्यात आले आहे.
६. अमरावती जिल्ह्यात राज्य राखीव पोलीस गट क्र. ९ अमरावती येथील परिसरामध्ये जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण केंद्र स्थापन करण्यात आले आहे.
७. आपत्ती व्यवस्थापन याविषयी अमरावती जिल्ह्यात शाळा सुरक्षा कार्यक्रम, गाव कार्यक्रम, शासकीय कर्मचारी महाविद्यालयीन विद्यार्थी एनसीसी, एनएसएस या विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले जाते.
८. अमरावती जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापन याविषयी काय करावे, व काय करू नये याकरिता मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्याकरिता एनडीआरएफ पुणे, एसडीआरएफ नागपूर, डीडीआरएफ अमरावती यांच्या मार्फत कार्यक्रम राबविण्यात येते.
९. जिल्हा शोध बचाव पथकामध्ये एकूण ११ कर्मचारी आहे.
१०. जिल्हा शोध व बचाव पथकाकरिता एक नवीन रेस्क्यू वाहन खरेदी करण्यात आले आहे.