Close

जिल्हाधिकारी कार्यालय

जिल्हाधिकारी कार्यालय बाबत

जिल्हाधिकारी हे जिल्हाधिकारी कार्यालयाचे प्रमुख  प्रशासकीय अधिकारी असतात ते भारतीय प्रशासकीय सेवा (आय.ए.एस.) व्दारे नियुक्त केलेले असतात व ते  राज्य शासना अंतर्गत येणा-या जिल्हयातील महसूल विभागाचे तसेच इतर सर्व विभागाचे समन्वय  अधिकारी असतात. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अधिपत्याखाली अनेक शाखा  येतात ज्यावर विविध अधिकारी म्हणजेच उपजिल्कारी व समतुल्य अधिकारी यांचे नियंत्रण असते. अपर जिल्हाधिकारी हे जिल्हाधिकारी यांना मदत करतात व त्यांच्या कडे जिल्हाधिकारी कार्यालयामधील काही विभागचे नियंत्रण असते. निवासी  उपजिल्हाधिकारी आणी अपर जिल्हा दंडाधिकारी  जिल्हाधिकारी यांना जिल्हाप्रशासनात मदत करतात.

जिल्हाधिकारी कार्यालातंर्गत येणारे कामे.

 • जिल्हयामधील कायदा व सुव्यवस् राखणे.
 • महसूल वसूली
 • भुसंपादन व मुल्यांकन
 • विधानसभा व संसदेची निवडणूक प्रक्रीया राबविणे.
 • आपत्ती व्यवस्थापन
 • महसूली केसेस
 • अन्न व नागरी पुरवठा
 • खणीकर्म महसूल वसूली
 • शासकीय जमीन वाटप
 • जिल्हा नियोजन व विकास
 • जिल्हयातील इतर विभागांशी समन्वय साधने
 • उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांचेवर नियंत्रण

 

जिल्हाधिकारी कार्यालयातील विविध शाखा

 • महसूल शाखा
 • निवडणूक शाखा
 • रोजगार हमी योजना
 • अन्न व नागरी पुरवठा
 • संजय गांधी योजना
 • पुर्नवसन शाखा
 • जिल्हा नियोजन शाखा
 • भूसंपादन शाखा
 • खणीकर्म शाखा
 • लेखा शाखा
 • गृह शाखा
 • आपत्ती व्यवस्थापन शाखा
 • नगरपालीका प्रशासन शाखा
 • करमणूक शाखा
 • दस्तऐवज शाखा
 • आस्थापना शाखा