PM किसान हप्ता स्थिती अहवाल
लाभार्थी:
शेतकरी कुटुंबे (पती, पत्नी आणि त्यांची 18 वर्षाखालील मुले)
फायदे:
शेतकरी कुटुंबे
अर्ज कसा करावा
शेतक-यांना निश्चीत उत्पन्न मिळण्याकरीता केंद्र शासनाने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरु केली आहे. सदर योजनेअंतर्गत विहित निकषांप्रमाणे ज्या कुटुंबाचे (पती-पत्नी) व त्यांचे 18 वर्षाखालील अपत्य) दि.01.02.2019 पर्यंतचे लागवडीलायक क्षेत्र असलेल्या पात्र शेतकरी कुटुंबियांस रु.2000/- प्रती हप्ता या प्रमाणे तीन हप्त्यात एकुण रु.6000/- प्रतीवर्ष लाभ अनुज्ञेय आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत अमरावती जिल्हयात एकुण 3,41,723 (अक्षरी – तीन लक्ष एकेचाळीस हजार सातशे तेवीस फक्त) लाभार्थ्यांनी नोंद केली असून सन 2024 मध्ये सद्यस्थितीत दोन हप्त्याचा एकुण – 80,99,34,000/- (अक्षरी-अंशी कोटी नव्यान्नव लक्ष चौतीस हजार) इतका व १७ व्या हप्त्यापर्यंत एकुण – 1003,01,28,000/- (अक्षरी-एक हजार तिन कोटी एक अठ्ठावीस हजार) लाभ लाभार्थ्यांना देण्यात आलेला आहे
पहा (835 KB)