Close

संजय गांधी निराधार योजना

तारीख : 01/03/2019 - 31/03/2031 | क्षेत्र: शहरी व ग्रामीण

संजय गांधी निराधार अनुदान योजना

संजय गांधी निराधार अनुदान योजना ही महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाची योजना आहे. या योजनेअंतर्गत केवळ महाराष्ट्रातील कायमचे रहिवासी असलेले निराधार, वयोवृद्ध, अनाथ, दिव्यांग, विधवा, तृतीयपंथी इत्यादी पात्र नागरिक अर्ज करू शकतात. या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना डिसेंबर २०२४ पासून दरमहा ₹१,५००/- ची आर्थिक मदत डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर (DBT) द्वारे दिली जाते.


सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या विविध योजना:

  1. संजय गांधी निराधार अनुदान योजना
  2. श्रावणबाळ राज्य सेवा निवृत्ती वेतन अनुदान योजना
  3. इंदिरा गांधी राष्ट्रीय वृध्दापकाळ निवृत्ती वेतन योजना
  4. इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना
  5. इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजना
  6. राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना

शासन निर्णय क्रमांक: विसयो-२०१८/प्र.क्र.६२/विसयो दि. २० ऑगस्ट २०१९


अर्ज प्रक्रिया:

  1. पहिली पायरी: तहसील कार्यालय / जिल्हाधिकारी कार्यालय / तलाठी कार्यालय येथे भेट देऊन योजनेची पात्रता समजून घ्यावी.
  2. दुसरी पायरी: अर्ज फॉर्ममध्ये सर्व आवश्यक माहिती भरावी, पासपोर्ट आकाराचा फोटो लावावा व आवश्यक (स्व-प्रमाणित) कागदपत्रे जोडावीत.
  3. तिसरी पायरी: अर्ज व कागदपत्रे सेतु केंद्र, महा ई-सेवा केंद्र किंवा आपले सरकार पोर्टलद्वारे ऑनलाईन सबमिट करावा.
  4. चौथी पायरी: अर्ज सादर केल्याची पोच पावती मिळवावी.

१. संजय गांधी निराधार अनुदान योजना (एकूण लाभार्थ्यांची संख्या ९९०६५)

पात्रता:

  • अर्जदार किमान १५ वर्षांपासून/ महाराष्ट्राचा कायम रहिवासी असावा.
  • वय: ६५ वर्षांपेक्षा कमी असावे.
  • वार्षिक उत्पन्न:
    • कुटुंब दारिद्र्यरेषेखालील (BPL) यादीत असावे किंवा
    • वार्षिक उत्पन्न ₹२१,०००/- पेक्षा जास्त नसावे (दिव्यांगांसाठी वार्षिक उत्पन्न ₹५०,०००/- पर्यंत)

पात्र अर्जदार:

  • ६५ वर्षांखालील निराधार पुरुष व महिला
  • अनाथ मुले
  • सर्व प्रकारचे अपंग (PWD)
  • क्षयरोग, कर्करोग, एड्स, कुष्ठरोग, सिकलसेल इ. यासारख्या दुर्धर आजारांनी पीडित असणारे आणि स्वतःचे पालनपोषण करू न शकणारे नागरिक
  • निराधार विधवा (शेतकऱ्यांच्या आत्महत्या केलेल्या विधवांसह)
  • घटस्फोटित / घटस्फोट प्रक्रिया सुरू असलेल्या पण पोटगी मिळत नसलेल्या महिला
  • अत्याचार पीडित महिला आणि वेश्याव्यवसायातून मुक्त झालेल्या महिला
  • तृतीयपंथी, देवदासी, तसेच  ३५ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या अविवाहित महिला
  • तुरुंगात शिक्षा भोगणाऱ्या कैद्यांच्या पत्नी

आवश्यक कागदपत्रे:

  • वयाचा पुरावा: जन्म प्रमाणपत्र / शाळा सोडल्याचा दाखला (TC) / मतदार यादीतील वयाचा उतारा / आधार कार्ड /शासकीय वैद्यकिय अधिकाऱ्याने दिलेला वयाचा दाखला .(कोणतेही एक)
  • रहिवासी दाखला: ग्रामसेवक/तलाठी / मंडळ अधिकारी यांनी दिलेला दाखला किंवा अधिकृत अधिवास प्रमाणपत्र.(कोणतेही एक)
  • वार्षिक उत्पन्नाचा दाखला: तहसीलदार / उपविभागीय अधिकारी यांनी दिलेला प्रमाणपत्र.
  • वैद्यकीय प्रमाणपत्र: अपंगत्व / गंभीर आजार / तृतीयपंथी / अत्याचारित स्त्री (शासकीय रुग्णालयाकडून जारी)
  • बँक खाते माहिती: बँकेच्या पासबुकचे पहिले पान (IFSC कोडसहित)
  • आधार कार्ड: बँक खात्याशी लिंक असणे आवश्यक
  • विवाह प्रमाणपत्र व पतीच्या मृत्यूचा दाखला (विधवा अर्जदारांसाठी)

लाभाचे स्वरूप:

  • दरमहा ₹१,५००/- आर्थिक मदत

२. श्रावणबाळ निवृत्ती वेतन अनुदान योजना (एकूण लाभार्थ्यांची संख्या १८३६८७)

  • वय: ६५ वर्षांपेक्षा जास्त असावे.
  • वार्षिक उत्पन्न: संजय गांधी निराधार अनुदान योजनेप्रमाणे
  • आवश्यक कागदपत्रे: संजय गांधी निराधार अनुदान योजनेप्रमाणे
  • वयाचा पुरावा:संजय गांधी निराधार अनुदान योजनेप्रमाणे
  • रहिवासी दाखला: संजय गांधी निराधार अनुदान योजनेप्रमाणे

लाभाचे स्वरूप:

  • दरमहा ₹१,५००/-

३. इंदिरा गांधी राष्ट्रीय वृध्दापकाळ निवृत्ती वेतन योजना (एकूण लाभार्थ्यांची संख्या ४६१८७)

  • वय: ६५ वर्षांपेक्षा जास्त असावे.
  • वार्षिक उत्पन्न: कुटुंब दारिद्र्यरेषेखाली (BPL) असावे.

लाभाचे स्वरूप:

  • दरमहा ₹१,५००/- (₹२००-₹५०० केंद्र शासनाकडून, उर्वरित राज्य शासनाकडून)

४. इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना (एकूण लाभार्थ्यांची संख्या २६३७)

  • वय: ४० ते ७९ वर्षे
  • पतीच्या मृत्यूचा दाखला: जन्म/मृत्यू नोंदणी उतारा
  • वार्षिक उत्पन्न: कुटुंब दारिद्र्यरेषेखाली (BPL) असावे.
  • वयाचा पुरावा:संजय गांधी निराधार अनुदान योजनेप्रमाणे
  • रहिवासी दाखला: संजय गांधी निराधार अनुदान योजनेप्रमाणे

लाभाचे स्वरूप:

  • दरमहा ₹१,५००/- (₹३०० केंद्र शासनाकडून, ₹१,२०० राज्य शासनाकडून)

५. इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजना (एकूण लाभार्थ्यांची संख्या ३८४)

  • वय: ४० ते ७९ वर्षे
  • अपंगत्व प्रमाणपत्र: जिल्हा शल्यचिकित्सक (सिव्हिल सर्जन) यांनी दिलेले प्रमाणपत्र
  • वार्षिक उत्पन्न: कुटुंब दारिद्र्यरेषेखाली (BPL) असावे.
  • वार्षिक उत्पन्न: संजय गांधी निराधार अनुदान योजनेप्रमाणे
  • वयाचा पुरावा:संजय गांधी निराधार अनुदान योजनेप्रमाणे
  • रहिवासी दाखला: संजय गांधी निराधार अनुदान योजनेप्रमाणे

लाभाचे स्वरूप:

  • दरमहा ₹१,५००/-(₹३०० केंद्र शासनाकडून, ₹१,२०० राज्य शासनाकडून)

६. राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना (एकूण लाभार्थ्यांची संख्या १२७५)

  • लाभार्थी: कुटुंबाचा प्रमुख कमावता सदस्य मृत झाल्यास त्याच्या वारसास ही मदत दिली जाईल.(कमावती व्येक्ति कुटुंबातील स्त्री किंवा पुरुष कोणीही असू शकते.)
  • वय: मृत झालेल्या कमावत्या व्यक्तीचे वय १८ ते ५९ वर्षे (६० पेक्षा कमी) असावे.
  • वार्षिक उत्पन्न: कुटुंब दारिद्र्यरेषेखाली (BPL) असावे.
  • अर्ज प्रक्रिया: तलाठी आवश्यक कागदपत्रांसह अर्ज तहसील कार्यालयात सादर करतील. तहसीलदार हा योजना मंजुरी अधिकारी असेल.

लाभाचे स्वरूप:

  •  एकरकमी ₹२०,०००/- आर्थिक मदत. केंद्र शासनाकडून

लाभार्थी:

मतिमंद अपंग , अक्षम असहाय्य, बी.पी.एल, वयोवृध्द

फायदे:

दरमहा ₹१,५००/- (DBT)

अर्ज कसा करावा

वर नमूद केल्याप्रमाणे.