जिल्हाधिकारी कार्यालय
जिल्हाधिकारी कार्यालय बाबत
जिल्हाधिकारी हे जिल्हाधिकारी कार्यालयाचे प्रमुख प्रशासकीय अधिकारी असतात ते भारतीय प्रशासकीय सेवा (आय.ए.एस.) व्दारे नियुक्त केलेले असतात व ते राज्य शासना अंतर्गत येणा-या जिल्हयातील महसूल विभागाचे तसेच इतर सर्व विभागाचे समन्वय अधिकारी असतात. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अधिपत्याखाली अनेक शाखा येतात ज्यावर विविध अधिकारी म्हणजेच उपजिल्कारी व समतुल्य अधिकारी यांचे नियंत्रण असते. अपर जिल्हाधिकारी हे जिल्हाधिकारी यांना मदत करतात व त्यांच्या कडे जिल्हाधिकारी कार्यालयामधील काही विभागचे नियंत्रण असते. निवासी उपजिल्हाधिकारी आणी अपर जिल्हा दंडाधिकारी जिल्हाधिकारी यांना जिल्हाप्रशासनात मदत करतात.
जिल्हाधिकारी कार्यालातंर्गत येणारे कामे.
- जिल्हयामधील कायदा व सुव्यवस् राखणे.
- महसूल वसूली
- भुसंपादन व मुल्यांकन
- विधानसभा व संसदेची निवडणूक प्रक्रीया राबविणे.
- आपत्ती व्यवस्थापन
- महसूली केसेस
- अन्न व नागरी पुरवठा
- खणीकर्म महसूल वसूली
- शासकीय जमीन वाटप
- जिल्हा नियोजन व विकास
- जिल्हयातील इतर विभागांशी समन्वय साधने
- उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांचेवर नियंत्रण
जिल्हाधिकारी कार्यालयातील विविध शाखा
- महसूल शाखा
- निवडणूक शाखा
- रोजगार हमी योजना
- अन्न व नागरी पुरवठा
- संजय गांधी योजना
- पुर्नवसन शाखा
- जिल्हा नियोजन शाखा
- भूसंपादन शाखा
- खणीकर्म शाखा
- लेखा शाखा
- गृह शाखा
- आपत्ती व्यवस्थापन शाखा
- नगरपालीका प्रशासन शाखा
- करमणूक शाखा
- दस्तऐवज शाखा
- आस्थापना शाखा