Close

तह-भातकुली

bhatkuli-head1

तहसिलदार, भातकुली यांचे कार्यालय

bhatkuli-head1

भातकुली तालुका हा अमरावती जिल्हयामध्ये समाविष्ठ आहे. भातकुली तालुक्याचे एकुण भौगोलीक क्षेत्र फळ ५८२२६.९४ हे. आर. आहे. सन. २०११ च्या जनगनने नुसार एकुण लोकसंख्या १.१३.१०९ इतकी आहे.

तालुक्यात शेती हे उपजीवीकेचे मुख्य साधन आहे. खारपाण पट्टा (Saline Belt) असल्याणे शेती ही मुख्यतः पावसाच्या पाण्यावर अवलंबुन आहे. कापूस, तुर, सोयाबिन, हरभरा ही मुख्यपीके आहेत. तालुक्याचे सरसरी पर्जन्यमान ७६२.२० मी.मी. आहे. तालुक्यातुन पेढी व पुर्णा नद्या वाहतात.

भातकुली तालुक्यात खालील प्रमाणे तिर्थक्षेत्र/पर्यटन क्षेत्र आहेत:

१. ऋणमोचण – ऋणमोचण ही संत गाडगेबाबा यांची कर्म भूमि आहे. ऋणमोचण या ठिकाणी पुर्णा नदी काठी महादेवाचे मंदीर आहे. सदर ठिकाणी पौष महिन्यात यात्रा भरते.

२. गणोजादेवी – गणोजादेवी येथे महालक्ष्मी मंदीर आहे. नवरात्र उत्सवामध्ये मोठ्या प्रमाणात यात्रा भरते.

३. वायगाव श्री क्षेत्र – वायगाव येथे गणपती मंदीर आहे.

४. भातकुली – भातकुली तालुका मुख्यालय आहे. येथे श्री. आदिनाथ स्वामी दिगांबर जैन मंदिर आहे.

* भातकुली तालुक्यातील खोलापूर व भातकुली येथे पोलीस स्टेशन आहे.

महसूल विभाग:

१. मंडळ – ६

२. साझे – ३६

३. एकुण गावे – १४२

४. उजाड गावे – २९

५. पुनर्वसन गावे – ४

विधानसभा मतदारसंघ माहिती:

भातकुली तालुक्यातील पुर्णानगर, खोलापूर, आष्टी या मंडळांचा समावेश तिवसा विधानसभा मतदार संघात होतो. भातकुली, आसरा, निंभा या मंडळांचा समावेश बडनेरा विधानसभा मतदार संघात होतो.

अन्य सूचना:

तहसीलदार आणि इतर अधिकारी कर्मचारी तहसीलदार एवं अधिकारीगण

माहितीचा अधिकार अधिनियम 

मंडळ अधिकारी आणि तलाठी 

bhatkuli_office