रोजगार हमी
![]() |
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (मनरेगा),
जिल्हा. अमरावती |
अमरावती जिल्ह्यात एकूण १४ तालुके आहेत, ज्यापैकी चिखलदरा आणि धारणी हे दोन तालुके आदिवासी बहुल आहेत. या तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर मजुरांची संख्या असून, जिल्ह्यातील एकूण ४,६८,१६२ जॉब कार्डधारक कुटुंबांपैकी ८९,४३५ कुटुंबे मेलघाट (चिखलदरा व धारणी) भागातील आहेत. या कुटुंबांसाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (मनरेगा) ही अत्यंत लाभदायक ठरली आहे. या योजनेच्या माध्यमातून अमरावती जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर सार्वजनिक तसेच वैयक्तिक स्तरावर उपयुक्त अशी कामे पूर्ण करण्यात आली आहेत, ज्याचा थेट लाभ गावांमध्ये राहणाऱ्या नागरिकांना मिळाला आहे. मनरेगा अंतर्गत प्रस्तावित २६६ कामांपैकी अमरावती जिल्ह्यात सुमारे ६० ते ६५ प्रकारची कामे सातत्याने राबवली जातात. राज्यभरातील मजुरांना रोजगार उपलब्ध करून देण्याच्या आणि निधीच्या प्रभावी वापराच्या दृष्टीने अमरावती जिल्हा नेहमीच आघाडीवर राहिला आहे.
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत अमरावती जिल्हयातील झालेले नाविण्यपुर्ण कामे
१. अंगणवाडी बांधकाम ग्रामपंचायत इटकी, ता. दर्यापूर
२. डांबर रस्ता ग्रामपंचायत दिया, ता. धारणी
३. सिमेट रस्ता ग्रामपंचायत चटवाबोड, ता. धारणी
४. अस्तरीकरण शेततळे ग्रामपंचायत मोथा, ता. चिखलदरा
५. सलग समतल चर (CCT) ग्रामपंचायत मोथा, ता. चिखलदरा
६. सार्वजनिक धान्य गोदाम ग्रामपंचायत पाळा, ता. मोर्शी
७. ई-क्लास घटक लागवङ ग्रामपंचायत काटसूर, ता. मोर्शी
८. सार्वजनिक फळवृक्ष लागवड ग्रामपंचायत माधान, ता. चांदुर बाजार
९. वैयक्तीक फळबाग शालीनी केवटे ग्रा.पं. कजरगाव, ता. चांदुर बाजार
१०. मातोश्री पांदन रस्ते योजना अंतर्गत शेतापर्यंत पांदन रस्ते खडीकरण ग्रामपंचायत शिवणगांव, ता. तिवसा
११. संरक्षण भिंत जि.प.शाळा वडनेर गंगाई, ग्रा.पं. वडनेर, ता. दर्यापूर
१२. सिमेंट नाला बांध (CNB) ग्रामपंचायत मोथा तालुका चिखलदरा
अधिक माहिती करिता