Close

अंबादेवी मंदीर

श्री अंबादेवी मंदीर, अमरावती

अमरावती शहराचे हृदय गांधी चौकामध्‍ये अंबादेवीचे मंदीर आहे. हे मंदीर अतिशय प्राचीन आहे. भारतातील वेगवेगळया ठीकाणचे लोक अंबादेवीच्‍या दर्शनाला येतात तो त्‍यांच्‍या जीवनाचा अविभाज्‍य भाग आहे. नवरात्रीचा सण दसरा असतो तेव्‍हा असतो.मंदीरातील भक्‍त आणी अधिकारी नउ दिवस धार्मीक आणी सांस्‍कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करतात. नवरात्रीच्‍या सणाला   मोठा मेला भरला आहे असे वाटते. भक्‍तगण मोठया श्रध्‍देने अनवाणी देविच्‍या दर्शनाला येतात. असंख्‍य लोकांना राहण्‍यासाठी होस्‍टेलची व्‍यवस्‍था  केली आहे. अमरावती रेल्‍वे स्‍टेशन बसस्‍टापपासुन 1.5 कि.मी. अतंरावर आहे. अमरावती स्‍टेशनला वाहने आणी टॅक्‍सी उपलब्‍ध आहेत .बडनेरा रेल्‍वे स्‍टेशनला जाण्‍याकरिता टॅक्‍सीं उपलब्‍ध आहेत .(मुबंई – कलकत्‍ता मार्ग्‍)

विदर्भाचा राजा भिष्‍मक त्‍यांची मुलगी रुख्‍मीनी. तिने कृष्‍णाच्‍या धैर्य व साहसाच्‍या गोष्‍टी ऐकल्‍या होत्‍या. ती कृष्‍णावर प्रेम करित होती. तिचा भाउ रूख्‍मीय याने त्‍याचा मित्र शिशुपाल, छेडीचा राजा  याच्‍याशी तिचा विवाह ठरविला. रुख्‍मीनीने कृष्‍णाला गुप्‍त निरोप पाठवि‍ला, त्‍या दोघांनी मिळुन योजना तयार केली. शिशुपाल सोबत विवाह ठरण्‍या पुर्वी तिने अमरावती (महाराष्‍ट्र) येथिल एकविरादेवीच्‍या मंदीरास भेट दिली. काही यादवाच्‍या मदतीने येथुन कृष्‍णाने रुख्‍मीनीला पळवुन नेले. कृष्‍णा रुख्‍मीनीच्‍या भाउ रूख्‍मीय याच्‍याशी लढला. नंतर राजा भिष्‍मकाने त्‍या दोघांचा विवाह ठरवुन दिला.