Close

संत गाडगे बाबा

Sant Gadgebaba

बराचसे खालच्‍या समाजामधील लोक हे खेडेगावामध्‍ये गरिब आणी अशिक्षीत होते. ते पुजा करायचे  देव,  मराई आणी शितलतादेवीचे, त्‍यांना शेळया आणी कोबंडयाचा बळी दयायचे. देवाला खुष करायचे कारण त्‍यामुळे आजार बरे होतात, धान्‍य भरपुर प्रमाणात होते. अशी त्‍यांची समज होती.

डेबुजी याच समाजात जन्‍माला आले तरिसुध्‍दा त्‍यांनी प्रथम प्रांण्‍याचा बळी आणी अस्‍पृश्‍यता दुर केली. त्‍यांनी लोकांना स्‍वच्‍छतेचे महत्‍व पटवुन दिले, त्‍यांनी संपुर्ण महाराष्‍ट्रात धर्मशाळा, गोरक्षण विभाग, अंधाकरिता अन्‍नदान विभाग, अनाथाश्रम तयार केली.डेबुजी हा झिंगराजी आणी शकुबाई जानोरकर यांचा मुलगा. झिंगराजीच्‍या मृत्‍युनंतर डेबुजी आणी त्‍यांची आई त्‍यांच्‍या मामाच्‍या गावाला जाऊन राहीले. याच काळात ते एक चांगले शेतकरी  आणी गायक बनले. त्‍यांचा विवाह कुंताबाई यांच्‍याशी झाला. त्‍यांना चार मुले होती. त्‍यांना लहानपणापासुन प्रांण्‍याची कत्‍तल करणे आवडत असे. त्‍यासाठी त्‍यांना त्‍यांच्‍या नातलगाचा त्रास सहन करावा लागला.

डेबुजी हे धाडसीवृत्‍तीचे होते. एकदा सावकारांनी त्‍यांच्‍या शेतावर अधिकार दाखविण्‍याचा प्रयत्‍न केला पंरतु तो त्‍यांनी दुर केला. काही दिवसानंतर त्‍यांनी गाव सोडले. प्रत्‍येक गावोगावी जाऊन त्‍यांनी गावाची स्‍वच्‍छता केली. पुर्णा नदीवर त्‍यांनी घाट बांधण्‍यास सुरुवात केली. हळुहळु लोक त्‍यांच्‍या कार्याला समजुन मदत करण्‍यास सुरुवात केली. त्‍यांच्‍या कार्याला पुढे नेणारे भरपुर लोक होते. त्‍यांच्‍या मध्‍ये डॉ. बी.आर.आंबेडकर,आचार्य अत्रे हे होत. पैशाच्‍या स्‍वरुपात देणगी देऊन त्‍यांनी कार्यास पुढे नेण्‍यास सुरुवात केली. पंढरपुर, नाशिक, आंळदी, पुणे, आणी देहु येथे त्‍यांनी हरिजनासाठी धर्मशाळा बांधल्‍या. विदर्भामध्‍ये त्‍यांनी गायीच्‍या कत्‍तली थांबविण्‍यासाठी गौरख विभाग बांधले. अंध, अंपग, गरिब यांच्‍यासाठी त्‍यांनी अन्‍नदान विभाग बांधले. त्यांनी लोकांसाठी घरे बांधली ज्‍यांना कुणी आधार ना‍ही. कुष्‍ठरोगीसाठी भरपुर कामे केली.

स्‍त्रोत – श्री गाडगे महाराज, गो. नी. दांडेकर