Close

संस्कृती आणि वारसा

मेळघाटाामधील नागरीक

Culture of Melghatमेळघाटमध्ये  आदीवासी लोकांचे वास्तव्य असुन तेथे मुख्यता कोरकू, गोंड, निहाल, बलाई या जातीचे लोक आढळतात व उर्वरीत लोक हे गवळी जातीचे आहे.

गवळी

गवळी हे लोक परंपरेने व्यापलेले असतात. शेती करण्यामध्ये त्यांना फारसा रस नसतो हे लोक मुख्यता गुरे-ढोरे सांभाळुन आपला उदर निर्वाह करतात. त्यांच्;याकडे मोठया प्रमाणात शेळया-मेंढया असतात तसेच प्रत्येक परीवाराकडे साधारण  २०-४० प्राणी असतात. दुग्जन्य पदार्थ विक्री करणे हे त्यांचे महत्वाचे उत्पादन साधन आहे. गवळी लोक हुशार तसेच मेहनती असतात.

कोरकु/गोंड/निहाल

जवळपास एका शतकापासुन पारंपारीकरीत्या कोरकु लोक हे जंगल संरक्षण तसेच जंगलामध्ये काम करुन उत्पादन घेण्यासाठी ओळखले जातात. हे लोक नेहमी जंगल संरक्षणासाठी तसेच जंगल विकासासाठी मजुर पुरवतात. १९७३ नंतर वनहक्क कायदया अंतर्गत येथील स्थानीक लोकांनी प्रत्येक परीवाराकरीता ५ एकर इतकी जमीन मिळवली असुन त्यावर ते उदरनिर्वाह करतात. डेअरी व्यवसायाकरीता त्चेकडे परवानगी नसते.

बलई/ गवलान/ राठया

बलई लोक  अभ्यारण्यामधील गावांमध्ये स्थायीक झाले आहेत. गवलान लोकांना पारंपारीक दृष्टया इतर अनुसुचीत जमाती पेक्षा महत्वाचे मानले जाते हे लोक प्रामुख्याने शेती करतात.

खांडवा ते अकोला मार्ग जोडण्याकरीता बाहय स्त्रोतामार्फत मजुर बोलवण्यात येतात. रेल्वे चे काम पुर्ण झाल्यानंतर हे लोक गावामध्ये थायीक झाले आहेत यांना राठया म्हणतात. हे लोक खुप मेहनती तसेच स्वभावाने रागीट असतात