कौन्दाण्यापूर मंदिर, अमरावती


 

चांदुर तहसिल मध्‍ये कौडण्‍यपुर तिर्थक्षेत्र वर्धा नदीच्‍या काठावर वसलेले आहे. नैसर्गिक पर्वत, नदीच्‍या पश्चिमेकडील बाजुला श्‍वेत मंदीर आहे. त्‍या मंदीरामध्‍ये चार ब्रम्‍हाच्‍या मुर्ती आर्णी विष्‍णुची मुर्ती आसनस्‍थ आहेत. कौडंण्‍यपुर ही विदर्भाचा राजा भिष्‍मकाची प्राचीन राजधानी होती. दुसरे पर्वत म्‍हणजे भिम टेकडी. ही गावाच्‍या दक्षिणेकडील भागाला राजा भिष्‍मकाच्‍या राजवाडया जवळ आहे. राजा भिष्‍मकाच्‍या मुलीचे नाव रूख्‍मीनी. याच पर्वतावर विठ्ठल रुख्‍मीनीचे मंदीर आहे. हजारो लाखो भाविक विठ्ठलाच्‍या दर्शनाला कार्तीक पोर्णिमेला नोंव्‍हेबर महिण्‍यात येतात.