मा. मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस जिल्हा दौरा -मालूर  

मालूर  - दौरादरम्‍यान बैठकांमध्‍ये दिलेले निर्देश

अ – मालुर गावातील गांव तलाव खेालीकरणाचे काम त्‍वरित सुरु करण्‍यात यावे.

ब – महिला बचत गटांकडुन प्राप्‍त प्रकल्‍प मंजुर करुन बँकेकडुन कर्ज पुरवठा त्‍वरित करण्‍यात यावे.

क – मालुर गावतील नागरिकांनी दाखल केलेले जात प्रमाण्‍पत्र तहसिल व उप विभगीय कार्यालयाकडुन तातडीने देण्‍यात यावेत.

ड – मालुर गावतील नागरिकांना महाराष्‍ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत मागणीप्रमाणे काम देण्‍यात यावे.

इ – हरीसाल ते चौराकुंड या रस्‍त्‍यावरील बसक्‍या पुलाचे ठिकाणी उंच पुलाचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाने सुरु करावे हा चालु रस्‍ता असल्‍यायने वन विभागाकडुन कोण्‍त्‍याही परवानगीची आवश्‍यकता नाही.

फ – मालूर मध्‍ये पिण्‍याच्‍या पाण्‍या करीता गावातील नागरीकाना जळगा नदी पार करुन जा लागते त्‍या साठी पीण्‍याच्‍या पाण्‍याची सोय नदीच्‍या अलीकडील गावात करण्‍यात यावी.