मा. मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस जिल्हा दौरा -मेळघाट– दौरा दरम्यान बैठकांमध्येय दिलेले निर्देश

आरोग्‍य

- मेळघाट भागातील वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांची रीक्‍त पदे भरण्‍यात यावी.

- प्राथमिक आरोग्‍य केंद्र उपकेंद्र नियमीत दुरुस्‍ती देखभाल व आवश्‍यक सोई सुवीधा बाबत विधुतीकरण नियमीत पाणी पुरवठा ई बाबत कार्यवाही करण्‍याचे निर्देश मा मुख्‍यमंत्री मोहदयानी दिले.

- नवीण प्राथमीक आरोग्‍य केंद्र व उपकेंद्र स्‍थपने बाबत तसेच टायगर प्रोजेक्‍ट व प्रकल्‍पबाधीत गावतील उपकेंद्र ई आरोग्‍य संस्‍था स्‍थनांतर करण्‍याबाबत.

- वैधकीय अधिकारी व कर्मचारी यांची निवासस्‍थने दुरुस्‍त करण्‍याबाबत.

महीला व बाल विकास

- ग्राम बालविकास केंद्र

मध्‍यम व तिब्र कुपोषित श्रेणीमधील बालकांना सर्वसाधारण श्रेणीत आणण्‍यासाठी ग्राम बालविकास केंद्र (VCDC) ची महत्‍वपुर्ण भुमीका आहे सदर केद्र 1 महिण कालावधी करीता असुन या 1 महीण्‍या मध्‍ये कुपोषित बालकांना अतिरिक्‍त आहार व औषधी ग्राम बालवीकास केंद्रा मध्‍ये दिल्‍या जातात. या मुळे SAM MAM श्रेणीतील बालके सर्वसाधारण श्रेणी मध्‍ये येण्‍यास मदत होते या बाबत मा मुख्‍य मंत्री महोदयाना अवगत करण्‍यात आले असता बंद असलेले ग्राम बालवीकास केंद्र त्‍वरीत सुरु करण्‍या बाबत निर्देश दिले.

- पाळणा घर योजना

मेळघाट भागातील पालक 3 वर्षया खालील बालकाना घरी ठेवुन मोलमजुरीकरिता निघुन जातात घरी या बालकांचा सांभाळ त्‍यांच्‍या पेक्षा मोठी असलेली भंवडे किंवा वयोवृध्‍द व्‍यक्‍त्‍ी करतात त्‍यामुळे त्‍या बालकांचे पोषण व्‍यवस्‍थीत रीत्‍या होत नसल्‍यामुळे कुपोषणाच्‍या प्रमाणत वाढ होते ते प्रमाण कमी व्‍होवे या करीता मेळघाट भगातील चिखलदारा व धारणी या 2 तालक्‍यांमध्‍ये सन 2012-13 या वर्षात 100 पाळणाघरे सुरु करण्‍यात आली होती. या पाळणा घरांमुळे कुपोषणाच्‍या प्रमाणत घट झाली होती. पंरतु नंतरच्‍या वर्षा पासुन या पाळणा घरा करीता अनुदान प्रप्‍त न झाल्‍या मुळे हि पाळणा घरे बंध पळलेली आहेत. या बाबत मा मुख्‍य मंत्री महोदयाना अवगत आले असता मा मुख्‍य मंत्री महोदयानी पाळणा घरे सुरु करण्‍या बाबत निर्देश दिले.

विधुत

- मध्‍यप्रदेश राज्‍यातील नेपानगर पासुन धारणी पर्यात 55 किमी ट्रन्‍समिशन लाईनचे काम मार्च 2015 पर्यत सुरु करण्‍यात यावे.

- हिवरखेड ते धारणी 32 किलो व्‍हॅटची हायटेंशन लाईनचे काम करण्‍यासाठी रु 27 कोटीची तरतुद आदिवासी विभागाकडुन मंजुर करण्‍यात यावी.

आश्रम शाळा

- राज्‍य शासन आदीवासी विकास विभागाच्‍या शासकीय व स्‍वयंसेवी संस्‍थांच्‍या आश्रम शाळेसाठी बेंच मार्क निरमाण करणार असुन या शाळांच्‍या विकासाचा प्रयत्‍न करण्‍यात येईल.

- आदिवासी विधर्थ्‍यांना नियमा प्रमाने भैतीक सोयी सुविधा उपलब्‍ध करुन देण्‍यात याव्‍यात तसेच शैक्षणिक सोयी सुवीधा पुरवाव्‍यात.

- प्रत्‍येक शाळैचा शैक्षणिकी दर्जा उंचावण्‍याचे प्रयत्‍न करावे.

- विधर्थ्‍यांचे प्रश्‍न स्‍थानिक स्‍तरावर सोडविण्‍यात यावे.

- हरिसाल यथे वर्ग पाहीणी केली असता शिक्षणाचा दर्जा विाढविण्‍याची जबाबदारी शिक्षकांची आहे.

- अनुदानीत आश्रम शाळेच्‍या प्रतिनिधींनी दिलेल्‍या निवेदनातीलज समस्‍या नियमाप्रमाणे सोडविण्‍यात येतील.

मुद्दा तपशील

1. मेळघाट भागतील वौद्दकिय अधिकारी व कर्मचारी पदाच्‍या रिक्‍त जागा भरण्‍योबाबत.

2. प्रा आ केंद्र उपकेंद्र नियमीत दुरुस्ति देखभाल व आवश्‍यक सोई सुविधाबाबत (विद्दुतीकरण नियमीत पाण पुरववठा ईत्‍यादी).

3. निवीन प्राआ केंद्र उपकेद्र स्‍थपनेबाबत तसेच टायगर प्रोजेक्‍ट व प्रकल्‍प बाधीत गावतील उपकेंद्र ईतर आरोग्‍य संस्‍था स्‍थानांतर करणेबाबत.

4. वैद्दकिय अधिकारी व कर्मचारी यांचे निवाससथान दुरुस्तिबाबत.