मा. मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस जिल्हा दौरा - चौराकुंड

चौराकुंड- दौरादरम्‍यान बैठकांमध्‍ये दिलेले निर्देश

अ – चौराकुंड गावामध्‍ये जाणारा 1.5 किमी रस्‍ता डाबंरीकरण करुन देण्‍यात यावा अशी नागरीकाणी मागणी केली.
ब – चौराकुंड जिल्‍हापरीषद शाळेमध्‍ये नवीण चार खोल्‍या बाधन्‍यात याव्‍या.

ग्राम बालविकास केंद्र

मध्‍यम व तिब्र कुपोषित श्रेणीमधील बालकांना सर्वसाधारण श्रेणीत आणण्‍यासाठी ग्राम बालविकास केंद्र (VCDC) ची महत्‍वपुर्ण भुमीका आहे. सदर केद्र 1 महिण कालावधी करीता असुन या 1 महीण्‍या मध्‍ये कुपोषित बालकांना अतिरिक्‍त आहार व औषधी ग्राम बालवीकास केंद्रा मध्‍ये दिल्‍या जातात या मुळे SAM MAM श्रेणीतील बालके सर्वसाधारण श्रेणी मध्‍ये येण्‍यास मदत होते. या बाबत मा मुख्‍य मंत्री महोदयाना अवगत करण्‍यात आले असता बंद असलेले ग्राम बालवीकास केंद्र त्‍वरीत सुरु करण्‍या बाबत निर्देश दिले.

पाळणाघर योजना

मेळघाट भागातील पालक 3 वर्षया खालील बालकाना घरी ठेवुन मोलमजुरीकरिता निघुन जातात. घरी या बालकांचा सांभाळ त्‍यांच्‍या पेक्षा मोठी असलेली भंवडे किंवा वयोवृध्‍द व्‍यक्‍त्‍ी करतात त्‍यामुळे त्‍या बालकांचे पोषण व्‍यवस्‍थीत रीत्‍या होत. नसल्‍यामुळे कुपोषणाच्‍या प्रमाणत वाढ होते ते प्रमाण कमी व्‍होवे या करीता मेळघाट भगातील चिखलदारा व धारणी या 2 तालक्‍यांमध्‍ये सन 2012-13 या वर्षात 100 पाळणाघरे सुरु करण्‍यात आली होती.या पाळणाघरांमुळे 6 महिने ते 3 वर्ष या वयोगटातील मुलांचे पोषण जाबाबदार व्‍यक्‍तीकडुन होत असल्‍यामुळै कुपोषणायचे प्रमाणत घट झाली होती परंतु नंतरच्‍या वर्षपासुन या पाळणाघरांकरीता अनुदारन प्राप्‍त  न झाल्‍यामुळे ही पाळणाघरे बंद पडली आहे.या बाबत मा मुख्‍यमंत्री महोदयांना महीती दिली असता मा माहेदयांनी पाळणाघर सुरु करण्‍याबाबत कार्यवाही करण्‍याबाबत निर्देश दिले.